सिग्मा करिअर अकॅडेमीची ओळख
कोंकण हे निसर्गाने व जैव विविधतेने नटलेले एक सुंदर ठिकाण . या कोंकणातील सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,रायगड या जिल्ह्यांवर निसर्गाने मुक्त हस्ताने सुंदरतेची उधळण केलेली आहे . सिंधुदुर्ग जिल्हा तर संपूर्ण भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केला आहे .
कोंकणातील निसर्ग जेवढा सुंदर तेवढेच येथील लोक बुद्धिमत्तेने हुशार . संपूर्ण महाराष्ट्रात "कोंकण बोर्डचा" १०वी ,१२वी परीक्षांमध्ये सलग तीन वेळा सर्वोत्तम मार्क मिळविण्याचा विक्रम आहे . ई -ऑफिस प्रणाली संपूर्ण देशात राबविण्यासाठी "मॉडेल जिल्हा " म्हणून मान मिळविणारा सिंधुदुर्ग हा हुशार लोकांचा जिल्हा
एवढे सगळे असुनही या जिल्ह्यात बेकारीचे प्रमाण जास्त आहे . येथील विद्यार्थी हुशार असूनही प्रशासनात अथवा सरकारी नोकरी मध्ये येथील उमेदवारांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे . याचे कारण स्पर्धा परीक्षा विषयी येथे असलेला माहितीचा अभाव ,मार्गदर्शक व मार्गदर्शनाचा अभाव ,नोकरी मार्गदर्शक केंद्रांचा अभाव . याच गोष्टींचा विचार करून तसेच कोंकणातील उमेदवारांचे सरकारी नोकरीतील प्रमाण वाढावे ,
स्पर्धा परीक्षांविषयी येथे जागृती व्हावी व येथील उमेदवारांचा त्यात सहभाग वाढवा ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,रायगड येथील उमेदवार सुद्धा वर्ग-अ , वर्ग - ब अधिकारी बनावेत . पोलिस प्रशासन , आर्मी यामध्येही या जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवार असावेत व या नोकऱ्या मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उमेदवारांना या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी
"सिग्मा " या ग्रामीण भागातील युवकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने २६-जानेवारी -२०१४ रोजी "सिग्मा करिअर अकॅडेमी " ची स्थापना मु .पो वर्दे ,ता -कुडाळ ,जि -सिंधुदुर्ग येथे केली . या सिग्मा अकॅडेमी मध्ये तज्ञ मार्गदर्शकांकडून विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते.

 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094